शुक्रवार, ३० डिसेंबर, २०१६

पुण्याच्या मातीत तुकोबा ज्ञानोबा घडले

ज्या पुण्याच्या मातीत तुकोबा ज्ञानोबा घडले शिवछत्रपती संभाजी महाराज घडले . टिळक सावरकर घडले , चाफेकर बंधू घडले , राजगुरू घडले , सेनापती बापट घडले. किती किती ते थोर घडले जन्मले अगदी कोंढाण्याच्या लढाईत पडले दिल्लीच्या तक्तावर भगव्या झेंड्याचे राज्य करणारे महादजी शिंदेनी सुद्धा याच पुण्यात अखेरचा श्वास सोडला ज्या पुण्याने मुघलांची सत्ता पालटून दिल्लीला झुकवले अफगाणिस्थानाला पुन्हा हिंदुस्थानात वळवले , या पुण्यात कित्येक पराक्रम घडले गणना नाही तुलना नाही . त्याच पुण्याचा तरुण तरुणींना जर असे वाटायला लागले कि सनबर्न सारखा कार्यक्रम पुण्याच नाव रोशन करेल तर माझ्या सारख्या वेड्याने काय करावे डोकं आपटून घ्यावे कि दगड घालावा असे विचार एकूण तळपायाची आग मस्तकात जाते पण काय करावे लोकशाहीचे पवित्र मंदिर आडवे येते ....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा