शुक्रवार, ३० डिसेंबर, २०१६

श्रद्धास्थाने भग्न पावतात

गणेश उत्सव , शिवजयंती , डॉ आंबेडकर जयंती, अण्णाभाऊ साठे जयंती या तमाम उत्सवात सहभागी होऊन किंवा स्वतः नियोजन करून काही चंगळवादी मंडळी दारूच्या नशेत झिंग होऊन नाचत असतात. त्यांच्या या विभस्त वर्तवणुकी मुळे वरील श्रद्धास्थाने भग्न पावतात अशा वर्तवणुकी मुळे एकच दिसते वरील श्रद्धास्थानांशी चंगळवाद्यांना फक्त चंगळ करण्यापुरतेचे देणेघेणे असते. अशांची संख्या लक्षणीय असल्या मुळे यांच्याविरोधात आवाज उठवायचा म्हंटल कि अल्पसंख्यांक हिंदुत्ववाद्यांची गळचेपी होते. त्यातच हे लोक तुमची संस्कृती तुमच्या जवळ ठेवा , आम्ही आमच्या पैश्याने हे सर्व करतो , आम्हला व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे अशा वाक्यांचा मारा करून आपआपला चंगळवाद साधून मोकळे होतात . त्यात भर पडते म्हणजे चंगळवादी जन्मदात्यांची ३१ डिसेंबर जवळ येताच चंगळवादाची निर्मिती केंद्रे सज्ज होतात ठीकी ठिकाणी दारूचे केंद्रे डीजेची तयारी व नव्याने तारुण्यात पदार्पण केलेल्या सळसळनाऱ्या रक्ताच्या जोड्याना त्यांच्या रक्तात चंगळ वाद निर्माण करण्या साठी त्यांनाच मिळणारे आमंत्रण व त्याच्या पुढे या जोड्यां मध्ये निर्माण होणारे नवचंगळवादी समाज मग काय या समाजाला वरील सर्व श्रद्धास्थानांचे उत्सव म्हणजे चंगळवादाचे इव्हेंट्स वाटू लागतात प्रत्येक उत्सव हा चंगळ करण्यासाठीच असतो असा त्यांचा समज होतो व पवित्र उत्सवाचे स्वरूप चंगळवादी इव्हेंट्स मध्ये होते . आता गंमत अशी कि या निर्मिती केंद्रांचा विरोध करायचं म्हंटल कि इव्हेंट्सचे आयोजक तमाम न्यूज अँकर गणेश उत्सव ,शिवजयंती , आंबेकर जयंती या उत्सवा मध्ये होणार्या चेंगळवादाचे दाखले देऊन आपले कार्य साधून घेतात बरेच काही लिहिणे बाकी .........

पुण्याच्या मातीत तुकोबा ज्ञानोबा घडले

ज्या पुण्याच्या मातीत तुकोबा ज्ञानोबा घडले शिवछत्रपती संभाजी महाराज घडले . टिळक सावरकर घडले , चाफेकर बंधू घडले , राजगुरू घडले , सेनापती बापट घडले. किती किती ते थोर घडले जन्मले अगदी कोंढाण्याच्या लढाईत पडले दिल्लीच्या तक्तावर भगव्या झेंड्याचे राज्य करणारे महादजी शिंदेनी सुद्धा याच पुण्यात अखेरचा श्वास सोडला ज्या पुण्याने मुघलांची सत्ता पालटून दिल्लीला झुकवले अफगाणिस्थानाला पुन्हा हिंदुस्थानात वळवले , या पुण्यात कित्येक पराक्रम घडले गणना नाही तुलना नाही . त्याच पुण्याचा तरुण तरुणींना जर असे वाटायला लागले कि सनबर्न सारखा कार्यक्रम पुण्याच नाव रोशन करेल तर माझ्या सारख्या वेड्याने काय करावे डोकं आपटून घ्यावे कि दगड घालावा असे विचार एकूण तळपायाची आग मस्तकात जाते पण काय करावे लोकशाहीचे पवित्र मंदिर आडवे येते ....